home

h

सोन्यासारखा आनंद मिळवून देणारी गुंतवणूक !

कसा मिळवाल सोन्यासारखा आनंद ?

हल्लीच्या सततच्या चढ-उतार होणाऱ्या सोन्याच्या दरांमुळे प्रत्येकालाच सोन्यातील गुंतवणुकीचे नियोजन करणे अवघड जात आहे. सोन्याचे दर हे कितीही पटीने वाढले तरीदेखील आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग असतात ज्या प्रसंगांना आपल्याला सोन्याची खरेदी ही करावीच लागते.

हीच सोने खरेदी करण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन आयुष्यातून काही पैसे बाजूला काढून ठेवतो किंवा बँकेमध्ये विशिष्ट रकमेचे रिकरिंग सुरु करतो. आता लक्षात घ्या, आपण जे पैसे बाजूला काढून ठेवतो त्यातून आपल्याला इतर कुठलाच फायदा मिळत नाही आणि बँकेमधील चालू केलेल्या रिकरिंग मधून मिळणारा मोबदला देखील अत्यल्प असतो.

पु. ना. गाडगीळ, नळस्टॉप सादर करित आहेत – G.I.P (Gold Investment Plan) – एक अशी योजना, जी भविष्यातील तुमच्या सोने किंवा हिऱ्यांच्या दागिने खरेदीवर देईल भरघोस सूट आणि करेल तुमचा सोने खरेदीचा आनंद द्विगुणित.

योजनेबद्दल थोडक्यात

दर महिना छोटी छोटी करत मोठी होत जाणारी गुंतवणूक तुम्हाला देणार भरघोस सवलतींचा आनंद. या योजनेअंतर्गत सलग १० महिने एक विशिष्ट रक्कम तुम्ही आमच्याकडे जमा करा आणि मुदतपूर्तीनंतर मिळवा भरघोस सवलतींसह दागिने खरेदीचा आनंद.

योजना उदाहरणासहित समजून घेऊ

खरेदीचा तपशील
सोन्याची वेढणी
सोन्याचे दागिने
हिऱ्याचे दागिने

*वरील सर्व आकडे हे उदाहरणादाखल घेतले आहेत.

नियम व अटी

१. ही योजना आमच्या अश्या ग्राहकांसाठी अधिक फायद्याची ठरते, जे पुढील काळात आमच्याकडून दागिने खरेदी करू इच्छितात. ग्राहक या योजनेअंतर्गत आमच्याजवळ दर महिन्याला भरत असलेली विशिष्ट रक्कम त्यांच्या भावी काळातील खरेदीसाठीची आहे असे गृहीत धरले जाईल.

२. या योजनेचा लाभ तुम्ही फक्त पु. ना. गाडगीळ, नळस्टॉप येथील दालनामध्ये घेऊ शकता.

३. योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता पॅन कार्ड / आधार कार्ड आणि बँकेचे तपशील देणे आवश्यक आहे.

४. योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता पॅन कार्ड / आधार कार्ड आणि बँकेचे तपशील देणे आवश्यक आहे.

५. योजनेची रक्कम आपण रोख / डीडी / धनादेश / ऑनलाईन पेमेंट स्वरूपात भरू शकता.

६. या योजनेअंतर्गत किमान १००० ₹ पासून आणि ५०० ₹ च्या पटीतली रक्कम भरून तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकता.

७. तुमची योजना सुरु झाल्यापासून ३३० व्या दिवसापासून ते ३४९ व्या दिवसापर्यंत वेढणी / सोन्याचे दागिने / हिऱ्याचे दागिने खरेदी करण्याचे स्वातंत्र्य ग्राहकाला असेल. खरेदीच्या दिवशी जो दर असेल तोच दर या खरेदीला लागू होईल.

८. योजनेत सहभागी झाल्यावर ३३० व्या दिवसापासून ते ३४९ व्या दिवसापर्यंतच्या कालावधी दरम्यान काही कारणाने ग्राहकाला खरेदी करणे शक्य न झाल्यास योजनेची नोंदणी केल्यापासूनच्या ३५० व्या दिवशी पु. ना. गाडगीळ, नळस्टॉप योजनेच्या किंवा इतर कोणत्याही फायद्याशिवाय ग्राहकाने जमा केलेली रक्कम धनादेशाच्या स्वरूपामध्ये त्याला परत करेल .

९. दर महिन्यातील ठरलेल्या तारखेला हप्ता न भरल्यास त्या महिन्याकरिता १०० ₹ चा दंड आकारण्यात येईल.

१०. योजनापूर्तीच्या रकमेतून खरेदी केल्या जाणाऱ्या दागिन्यांवरील संपूर्ण घडणावळ आणि नियमाप्रमाणे असलेला GST ग्राहकाला भरावा लागेल, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही.

११. खरेदीच्या तारखांचा उल्लेख नोंदणी करताना दिलेल्या पावतीवर केला जाईल.

१२. आपण दिलेला धनादेश कोणत्याही कारणाने वटण्यास अडचण आल्यास, कमीतकमी ₹२५० किंवा बँकेनं लागू केलेली रक्कम, यापैकी जी रक्कम जास्त असेल, ती आपल्या एकूण रकमेतून वजा करण्यात येईल. चेक वटण्यात सतत अडचणी आल्यास वा काही गैरप्रकार लक्षात आल्यास पु. ना. गाडगीळ, नळस्टॉप कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय योजनेतील ग्राहकाचा सहभाग रद्द करू शकतात. तसेच अशा प्रकरणात संबांधित ग्राहकाला योजनेच्या कोणत्याही फायद्याशिवाय त्याने जमा केलेली रक्कम धनादेशाद्वारे परत केली जाईल.

१३. कोणत्याही कारणाने तुम्ही योजनेतून मुदतपूर्ती आधीच बाहेर पडण्याचा निर्णय घेतलात, तर तुम्हाला त्या तारखेपर्यंत जमा केलेल्या रकमेचा धनादेश देण्यात येईल. या परिस्थितीत तुम्हाला कोणत्याही योजनेचा कोणताही लाभ किंवा कोणताही इतर मोबदला मिळणार नाही.

१४. योजनापूर्तीच्या रकमेतून संपूर्ण रकमेचे सोन्याचे दागिने / हिऱ्याचे दागिने / वेढणी खरेदी करावी लागतील. ती खरेदी करायची नसल्यास, जमा झालेली संपूर्ण रक्कम ही फक्त धनादेशाच्या स्वरूपातच ग्राहकाला मिळेल. या रकमेवर इतर कोणताही मोबदला अथवा योजनेचा कोणताही लाभ घेता येणार नाही.

१५. योजनापूर्तीच्या रकमेतून दागिन्यांची खरेदी करताना दागिन्यांसाठी वापरलेल्या सोने / चांदीची किंमत मौल्यवान खड्यांची / हिऱ्यांची किंमत + मजुरी + हॉलमार्क चार्ज + कर या सर्वाचा अंतर्भाव करून रकमेचा विनियोग केला जाईल.

१६. योजनापूर्तीच्या रकमेमध्ये समाविष्ट होणारा दागिना अथवा वेढणी ही ग्राहकाला घेणे बंधनकारक असेल. याशिवाय त्या खरेदी दरम्यान काही रक्कम वाढल्यास ही ग्राहकाने स्वतंत्रपणे अदा करणे आवश्यक आहे.

१७. मुदतपूर्तीच्या दिवशी G.I.P योजनेच्या सर्व पावत्या जमा करणे आवश्यक आहे.

१८. खरेदी करतेवेळी नियमानुसार लागू असलेले कर भरावे लागतील.

१९. योजनेबद्दलचा कोणताही वाद-विवाद वा खटला मा. पुणे न्यायालयाच्या कक्षेत येईल.

२०. पु. ना. गाडगीळ, नळस्टॉप अंतर्गत G.I.P योजनेसाठी नोंदणी करताना ग्राहकाने सदर नियम व अटी वाचलेल्या आहेत. त्या त्याला समजलेल्या असून, त्या मान्य आहेत असे गृहीत धरले जाईल.

२१. या योजनेच्या नियम व अटी यांच्यात बदल करण्याचे किंवा ही योजना कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय स्थगित किंवा बंद करण्याचे सर्व अधिकार आणि हक्क पु. ना. गाडगीळ, नळस्टॉप पुणे यांच्याकडे सुरक्षित आहेत.

आजच नळस्टॉप येथील दालनाला भेट द्या

किंवा कॉल 020 2542 0500 | 86 6960 3591